Thursday, 27 August 2015

Technology, Life आणि बरच काही .......

   
               आजकल  जमाना watsapp  चा झालाय. जे काही सुचेल ते लगेच status  म्हणून टाकायचं  . एखाद्या गोष्टी बद्द्ल आपलं  मत मांडायला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आजच्या दुनियेत. Communication  ची साधने , पर्याय जरूर वाढली आहेत but  खरच आपल्यातला संवाद वाढला आहे का ?? विचार करण्यालायक गोष्ट आहे. आपल्याच जवळच्या माणसाशी आपल्या मनातलं बोलायला जास्तं विचार का करावा लागतो ?? गेल्या काही काळात खूपच प्रखरपणे  हा बदल आपल्या अवतीभोवती होत आहे आणि नकळतपणे  आपण ह्या situation  शी adjust  करायला लागलोय . Rather  जाणिवपूर्वक ignore  करायला लागलोय . 

            विचार तसा गहन आहे आणि म्हणायला तसा नाही पण . But  त्यावर full proof  असं solution देखील नाही . पण एक चांगला उपाय अचानक परवा  डोक्यात आला . मुंबईत साधारणता वीज जात नाही but  जेव्हा जाते तेव्हा खूप स्वतःचं महत्व समजावून जाते . परवा  अशीच आमच्याकडे माशी शिंकली आणि कधी नव्हे  ती वीज गेली . Light पंखा  नसल्यामुळे जीव कासावीस होत होता. घामाच्या धारांनी थैमान घातला  होता . माझी चिडचिड पाहून आईने एक सोपा उपाय सुचवला . ती म्हणाली थोड्या वेळेकरीता दार उघडे  ठेव . त्यामुळे  cross  ventilation  होईल आणि हवा खेळती राहिल . एकदमच फक्कड उपाय नव्हता तो पण त्याने काही काळ तरी हवा आली आणि जरा बरं वाटलं . त्या छोट्याश्या क्ल्रुप्तिने मला बरच काही दिलं आणि असं  वाटलं दार उघढच ठेवलं तर किती बरं  होईल ना . 


             त्या दिवशी खूप दिवसांनी शेजारच्या आजींना पहिलं. त्या देखील उकाडा सहन होत नसल्याने दरवाजा उघडून घरातल्याच झोपळ्यावर झोके घेत बसल्या होत्या. काही बोलू का , की  राहुदे . पण शेवटी गेलोच आणि विचारपूस करायचा ठरवलं . कोणी तरी घरात शिरलय ह्याची चाहुल लागताच त्यांनी कोण आहे अशी सहज हाक दिली . मी सुद्धा ओमकार आलोय असे उत्तर दिले . जरा जवळ जाताच मला निरखून पाहण्यास सुर्वात  केली त्यांनी . आवज जरी ओळखीचा वाटला तरी चेहरा तसा वेगळाच वाटत होता त्यांना माझा . ते पण बरोबरच आहे म्हणा . इतक्या दिवसांनी आठवण काढत होतो मी त्यांची . मी खरच शेजारचा ओमकारच आहे ना ह्याची खात्री पटताच बाजूला बसवला आणि तुझ्यासाठी खाऊ आणते म्हणत आतल्या खोलीत गेल्या .परत आल्या त्या माझ्या  आवडत्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या घेऊन . त्या पाहून मी देखील खुश झालो . एका क्षणात त्या मला लहान पाणात  घेऊन गेल्या. कसा मी धावत त्यांच्या कुशीत येउन त्या वड्या खायचो . On  second thoughts , मलाच स्वतःची  थोडीशी लाज वाटली . ह्या काळात कामाच्या ओघात , यशस्वी होण्याच्या प्रयत्नात ,माझ्या लाडक्या आजींना मी खरोखरच विसरून गेलेलो . But  त्यांना माझी आवड बरोबर लक्षात होती . चेहऱ्यावर हसू , आणि डोळ्यात टपोरे आसू  असा क्षण होता तो. थोडं गहिवरल्या सारखं झालं . पुढचा बराचसा वेळ मी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घलवला . लहानपणाची सोनेरी सहलच करून आलो जणू . कित्त्येक दिवसांनी मन मोकळ्या गप्पा मारल्याचा आनंद मिळाला. कदाचित इतके दिवसात chatting वर किव्वा फोनवर देखील मिळाला न्हवता . तेवढ्यात light आली आणि वरती फिरणारा पंखा पाहून आम्ही दोघेही खूश  झालो . आजींना प्रेमाचा बाय  बोलून मी परत घरी अलो.

           बघायला गेलं तर खूपच योगायोग्याने गोष्टी घडल्या -light  जाणे , दार उघडा ठेवणे आणि आजींबरोबर घालवलेला वेळ . वीज जाणे तर फक्तं निमित्तं होतं , खरी मज तर दार उघडण्यात होती .ते केलं नसतं तर पुढच्या गोष्टीच घडल्या नसत्या. ह्याच गोष्टीवर विचार करता मनात आलं , खरच काय हरकत आहे असाच दार उघडा ठेवण्यात . त्यासाठी वीज जायला पाहिजेच असा थोडीच आहे . दरवाजा उघडा ठेवून कदाचित अपोआप आपला संवाद वाढू शकेल. शेजारच्या काकूंनी बनवलेल्या अळूच्या वड्या खायला मिळतील. तेवढाच त्यांना देखील बरं वाटेल  अमेरिकेतील काम करत असलेल्या आपल्याच मुलाला खाऊ घालतेय असा आनंद मिळेल. आपण सणासुदीला दाराला तोरण लावतो , उंबरठ्यात रांगोळी काढतो . पण असच एके दिवशी नुसती आवड म्हणून फुलांनी दार सजवले , पायाखाली रांगोळी काढली तर काय हरकत आहे ? कित्ती  मजा येईल ना ??

            आज technology एवढ्या पुढे निघून गेली आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात  का काय सुरु आहे ते एका click  वर कळतं . म्हणायला गेलं तर चालतंफिरतं जगच आपण हातात घेऊन जात असतो . पण त्याच वेळी शेजारचे आजोबा अनेक त्रास सहन करून अंथरुणातच जीव सोडून गेलेत ह्याची जाणीव देखील होत नाही . त्यांच्या नातेवाईकांना सांत्वनासाठी सुद्धा कोणत्या तोंडाने भेटायला जावं हेच कळत नसतं . इतके दिवस साधी चौकशी पण केलेली नसते त्यांच्या प्रकृतीची . आत्ता मी अगदीच emotional  किंवा melodramatic sound  करत असलो  तरी हे fact  आपल्याला नाकारता येणार नाही . I guess we all will agree to this definitely .

          But at the same time I know परिस्थिती थोडी नाहीतर फारच बद्दली आहे . Competitions ना  मर्यादाच राहिली नाहीये . Materialistic  attitude च्या नावाखाली आपण खूपच synthetic बनत चाललो अहोत. आपल्याला  हसायला सुद्द्धा comedy shows च्या कुबड्यांची ची गरज लग्ते. साधं एकत्र टेबलावर बसून जेवायला सुद्धा आपल्याला जमत नही. त्यासाठी देखील  TV लागतो आपल्याला ?? जेवतानाही status वर किती likes मिळाल्या ह्याची काळजी असते. ही तर सुरवातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही . Technology झपाट्याने वेगाने वाढतेय , आपल्याला देखील त्या वेगाने वाढावे लागणार ,निश्चितच . But आपला conscience (भान) जीवंत ठेवून . After all, we are social animals. आपल्याला emotional support साठी माणसांचीच  गरज लागणार आहे . यंत्रांची नही .

             जाणीवा , सुखः , दुखः , भावना , माणुसकी आपण सोडता कामा नये.



धन्यवाद

ओमकार दिनेश जुवेकर