Friday, 20 July 2012


हिवाळ्यातील सायंकाळी एका वाड्यामंदी ,
जन्म झाला माझा , घडली अनोखी नांदी
शुभेच्छांचा वर्षाव करीत जमली थोर अनेक ,
सासऱ्यांचा ही मान राखेल , आमची गुणी लेक.

ऊब  असो त्या आजीच्या गोधडीची ,
वा  असो गोडवी त्या रात्रीच्या अंगाईची
पुन्हा न येणार ते दिन सोनमोलाचे ,
बालपणातील दडलेल्या त्या निरागस मायेचे .

आठवतेय मला ती खिडकीतील चिऊताई ,
दिसभर मागे धावणारी माझी आई
आठवतेय सुद्धा ती बालवाडीतली गाणी
काही दिवसातच जाणार आपली बाबांची राणी .

चिमुकल्या पायांतील रुणझुण पैंजण ,
वाड्या समोरील ते तुळशीचे आंगण
विरणार आता ती दिवाळी तो दसरा ,
सुरक्षित असा हा वाड्याचा आसरा .

वाड्यात वाढले वाड्यात घडले
भिनला हा वाडा माझ्या प्रत्येक कणात ,
वर्षानुवर्षांच्या ऋणानुबंधांना
तुडवू कसे मी एका क्षणात .



                                                                                 ओंकार दिनेश जुवेकर


1 comment: