हवेत दरवळला सुगंध वास ,
प्रसन्न अश्या या सुंदर सकाळी
किरणांचा राजा मात्र अजून उदास .
घरट्यात परतले पक्ष्यांचे थवे
मेघांची भरली जाहीर सभा ,
पहिल्या थेंबांना मुठीत पकडायला
बेचैन बळीराजा प्रतिक्षेत उभा .
आतूर होते सर्वांचे नयन
होते आतूर मातीतील प्रत्येक कण ,
थेंबांची पहिली सर येताच
आला तो अपेक्षित भ्रमानंद क्षण.
पहिल्या पावसाचे पहिले वैभव
चैतन्याची पहिली लहर,
न्हाहून निघाली संपूर्ण सृष्टी
नवजीवनाची पसरली बहर.
-ओंकार दिनेश जुवेकर
bharich..laich bhari.. :)
ReplyDeletemastttt
ReplyDeletedhanyavad mazhya priya mitraanno
ReplyDelete