भान हरपून बसत असे मी स्वतःचे ,
जेव्हा ती समोर येई,
ती नसतानाही मन माझे वेडे ,
तिच्या आठवणीतच गुंग होई.
तिची चाहुल लागताच क्षणी,
मनात काळ्यांचा बहार पसरतो ,
कळ्यांचे रुपांतर फुलांत होते,
सुवास मात्र तिचाच दरवळतो.
मोकळ्या घनदाट केसात तिच्या ,
वाटे स्वतःला गुंतवून घ्यावे ,
प्रेमाच्या तलावात डुबकी घेऊन,
आनंदाने त्यात पोहोत राहावे.
नजरेला नजर मिळून दोघांचे ,
भावनांचे भाष्य चालूच होते,
मनातल्या भावना शब्दरूपी याव्या ,
ह्याचीच वात दोघे पाहत होते.
मग वाटले धीर करुनी ,
भावनांचे संवाद शब्दात आणावे,
प्रेम व्यक्त करुनी तिच्या समोर,
स्वतःच्या मनाला मोकळे करावे.
कानांवर पडता तिच्या शब्द माझे,
न उलगडणारे चित्र उभे राहिले,
धक्का बसला की काय जणू,
मी त्या नजरेने तिला पहिले.
मनात पसरू लागली माझ्या,
चाहुल तिच्या प्रत्युत्तराची ,
आनंद धक्का देऊनी मजला,
तृप्त केली इच्छा मनाची.
जेव्हा ती समोर येई,
ती नसतानाही मन माझे वेडे ,
तिच्या आठवणीतच गुंग होई.
तिची चाहुल लागताच क्षणी,
मनात काळ्यांचा बहार पसरतो ,
कळ्यांचे रुपांतर फुलांत होते,
सुवास मात्र तिचाच दरवळतो.
मोकळ्या घनदाट केसात तिच्या ,
वाटे स्वतःला गुंतवून घ्यावे ,
प्रेमाच्या तलावात डुबकी घेऊन,
आनंदाने त्यात पोहोत राहावे.
नजरेला नजर मिळून दोघांचे ,
भावनांचे भाष्य चालूच होते,
मनातल्या भावना शब्दरूपी याव्या ,
ह्याचीच वात दोघे पाहत होते.
मग वाटले धीर करुनी ,
भावनांचे संवाद शब्दात आणावे,
प्रेम व्यक्त करुनी तिच्या समोर,
स्वतःच्या मनाला मोकळे करावे.
कानांवर पडता तिच्या शब्द माझे,
न उलगडणारे चित्र उभे राहिले,
धक्का बसला की काय जणू,
मी त्या नजरेने तिला पहिले.
मनात पसरू लागली माझ्या,
चाहुल तिच्या प्रत्युत्तराची ,
आनंद धक्का देऊनी मजला,
तृप्त केली इच्छा मनाची.
ओंकार दिनेश जुवेकर
my favourite.. !!! keep it up omya
ReplyDeleteawesummm...ekdam sundar
ReplyDeletedhanyavad majhya mitraaanno
ReplyDelete