कॉलेज माझी अनमोल जान,
आम्हा सर्वांचा जीव एके प्राण,
तुला विसरु तरी कसे मला सांग,
कॉलेज माझी अनमोल जान.
कट्ट्यावरची गरम कट्टिंग,
मित्रांमधली चुरशी बेट्टिंग,
कशी विसरु ती कैंटीन मधली सुरेल गान,
कॉलेज माझी अनमोल जान.
Bird
watching करण्याचा निखळ आनंद,
मुलांचा होता एकच छंद,
छंद जोपासण्यात हरपले भान,
कॉलेज माझी अनमोल जान.
Lectures
मध्ये काढल्या झोपा,
Pracs
मध्ये values ढापा,
पास होण्याकरता तडफड फार,
कॉलेज माझी अनमोल जान.
साजरी केले मित्रांचे birthdays ,
Rose
डे,
tie डे, वा असो फ्रेंडशिप डे,
अविस्मर्णीय आठवणी होत्या खुपच छान,
कॉलेज माझी अनमोल जान.
अल्पकाळातच जुळली चिरायु नाती,
आयुष्यभराच्या रेशीमगाठी,
भविष्य असणार अज्ञात रान,
कॉलेज माझी अनमोल जान.
ओंकार दिनेश जुवेकर
This comment has been removed by the author.
ReplyDelete