Saturday, 5 November 2011

आई ...........



गर्भाशयाच्या अनोळखी स्थळी,
विसावलो होतो मी सुखाने,
अज्ञात होते स्थळ मजला ,
तरी नांदत होतो मी दिमाखाने.

एका अंशातून मजला,
झाला उद्धार तुझ्या अंगणी ,
प्रेमापोटी तृप्त झालो,
लाभले मला अन्वस्त्रपाणी .

नऊ महिन्यांचा तो खडतर प्रवास,
भोगलास तू माझ्यासाठी ,
यातना दुःखे अनेक अडचणी,
सोसलेस तू प्रेमासाठी .

अज्ञात असणार जग पुढचे ,
मिळेल मला नवीन द्रुष्टी ,
कवेत तुझ्या विसावलो असेन ,
ज्ञानी होईल संपूर्ण सृष्टी .

गेल्या जन्माचे पुण्य असता ,
जन्म मिळाला तुझ्याच पोटी,
आई ह्या शब्दातच दडलंय,
विश्वातील सुख अनंतकोटी.   





ओंकार  दिनेश जुवेकर



7 comments: