जरा विचित्र वाटतय ना शीर्षक वाचून. पण ट्रेकला गेल्यावर एकाच वेळी या दोन्ही भावना कानांवर पडल्या नाही असा ट्रेकच होत नाही.एखादा नवखा ट्रेकर असेल तर ट्रेक करताना सतत त्याच्या मनात हेच शब्द येतात " आई शप्पथ! हा काय tough patch आहे. मी कसा चढणार?"." आई शप्पथ ! इकडून उतरताना तर माझी वाटच लागणार ." त्याच्या चेहऱ्यावरच्या घामावरून आणि मनात असण्याऱ्या tension वरुण आपण आरामात ओळखू शकतो , हा ह्याचा पहिलाच ट्रेक असणार. या उलट एखादा ट्रेकर ज्याने किमान ७-८ ट्रेक केलेले असतात व ट्रेकींग या कलेशी जो थोडा फार सुसंगत असतो , तो तर सगळ्यांना पाळायलाच सांगत असतो.त्याचा attitude थोडा बिनधसच असतो. त्याला आपल्याबरोबर हळू चालणारी मंडळी तर boreच वाटतात .अश्या या दोन विरोदाभास असणाऱ्या भावना पण प्रत्येक ट्रेकला सापडतातच.
मजेशीर म्हणजे मी ह्या दोन्ही category मधेल्या व्यक्तिरेखा अनुभवल्या आहेत. एखाद्या नवख्या ट्रेकरच्या भावना, त्याला असलेलं दडपण, tension हे तर मला माझ्या पहिल्या ट्रेक मध्ये कळलचपण आता जेव्हा आम्ही लोकांना ट्रेकिंगसाठी घेऊन जातो तेव्हा मला ही दुसरी बाजू देखील हळू हळू उमजायला लागली आहे. माझा तसा ट्रेकिंग चा अनुभव काही जास्त नसून चार वर्षांचाच आहे तरी ही, नवखा घाबरूट ट्रेकर ते 'Organiser ऑफ HYBRID TREKKER ' चा प्रवास कसा पटकन घडला हे माझा मलाच कळलं नाही.
माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक हा राजगड-तोरणा. आता मागे वळून वाटतं आपली ट्रेकिंग ची गाडी direct तिसऱ्याच gear मध्ये सुरु झाली. पण बरंच झालं ना एकदा कठीण विषयाचा पेपर सोडवला की बाकीचे पेपर हे बऱ्यापैकी सोपेच वाटतात. ट्रेकिंग च्या आठवणीतील तो ट्रेक अविस्मर्णीयच राहणार, आयुष्यभर. तो गारठा, ते धुकं ती हिरवळ आणि सतत ती मनातली धडधड .ते क्षण विसारणा अशक्यच. स्पेकिअल्ल्य, राजगा ते तोरणा चा प्रवास. पायाच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या आणि पोटात कावळ्यांचा ओरडून ओरडून घसा बसलेला. माझ्या आठवणी प्रमाणे मी अर्धा ट्रेक तर बसूनच केलेला आणि सतत मदतीसाठी हाथ मागून मित्रांना भंडावून सोडलं होतं.
पण आता मागे वळून पाहिलं तर वाटतं बराच पाणी पुलाखालून गेलाय. त्या काळी घाबरत उतरलेले patches आज सराईत धावत पार करताना काहीच वाटत नाही. ह्याचं कारण कदाचित HYBRID असावं. ४०-५० लोकांना एकत्र ट्रेकसाठी घेऊन जाणं, त्यांची ख्याली खुशाली बघणं व त्यांना सुखरूप परत आणणं. ह्याची जबाबदारी, त्याचं तेन्सिओन, हे त्या tough patches च्या तुलनेत खूपच challenging वाटतं.पण समाधानाची गोष्ट अशी की The journey is going on smoothly.
पार "अभी दिल्ली बहुत दूर हैं |"," ये तो सिर्फ शुरुवात हैं | बघायला गेलं तर ही सुरुवातच आहे. या वर्षी १५ ऑगस्ट ला HYBRID ला एक वर्ष पूर्ण झाली आणि हा खास दिवस आम्ही परत राजगडावर साजरी करायचे ठरवले. आत्ता कुठे आम्हाला पंख फुटले आहेत, अजून आकाशात उंच झेप घ्यायची बाकी आहे.Indeed Sky is the limit for us.
ओंकार दिनेश जुवेकर
HYBRID TREKKERS
No comments:
Post a Comment