Sunday, 20 November 2011

'ती'

भान हरपून बसत असे मी स्वतःचे ,
           जेव्हा ती समोर येई,
ती नसतानाही मन माझे वेडे ,
           तिच्या आठवणीतच गुंग होई.

तिची चाहुल लागताच क्षणी,
          मनात काळ्यांचा बहार पसरतो ,
कळ्यांचे रुपांतर फुलांत होते,
          सुवास मात्र तिचाच दरवळतो.

मोकळ्या घनदाट केसात तिच्या ,
         वाटे स्वतःला गुंतवून घ्यावे ,
प्रेमाच्या तलावात डुबकी घेऊन,
        आनंदाने त्यात पोहोत राहावे.

नजरेला नजर मिळून दोघांचे ,
       भावनांचे भाष्य चालूच होते,
मनातल्या भावना शब्दरूपी याव्या ,
       ह्याचीच वात दोघे पाहत होते.

मग वाटले धीर करुनी ,
      भावनांचे संवाद शब्दात आणावे,
प्रेम व्यक्त करुनी तिच्या समोर,
     स्वतःच्या मनाला मोकळे करावे.

कानांवर पडता तिच्या शब्द माझे,
        न उलगडणारे चित्र उभे राहिले,
धक्का बसला की काय जणू,
        मी त्या नजरेने तिला पहिले.

मनात पसरू लागली माझ्या,
     चाहुल तिच्या प्रत्युत्तराची ,
आनंद धक्का देऊनी मजला,
       तृप्त केली इच्छा मनाची.




ओंकार दिनेश जुवेकर
  



Friday, 11 November 2011

'ती' part 2

डोळ्यात मला तिच्या दिसत होती ,
       समुंदर की गेहराई ,
पोहण्याचे आमचे वांदे बघता ,
      कशाला करू मी घाई.

दुसरीचे केस होते इतके soft ,
     वाटले स्वतःला गुंतवून घेऊ ,
दोऱ्याचा गुंता कधी सोडवला नाही ,
     केसांमध्ये काय घंटा जाऊ.

काही दिवसांनी मिळाली तिसरी ,
     ओळख वाढवली आणि केली मैत्री ,
cell number ही घेतला तिचा त्या दिवशी,
     अन प्रेमाचे sms पाठवले त्या रात्री.

हळुवार नाजूक स्पर्शाने तिच्या ,
    अंगावर येत असे शहारा,
हातांचा print out  जेव्हा गालावर पडला ,
     तेव्हा समजला तिचा दरारा.

प्रेमाच्या ह्या मुख्य परीक्षेत ,
     वारंवार लागली ATKT,
निराश न होता आयुष्याकरता,
     मेहनतीने मिळवीन एक सुंदर beauty .





ओंकार दिनेश जुवेकर   
रामनारायण रुईया कॉलेज

Tuesday, 8 November 2011

बायोटेकचं जर्नल

जर्नल मध्ये जर्नल बायोटेकचं जर्नल ,
कागदी नुसतं पुस्तक की आहे आर्मीतला कर्नल.

नवीन वर्षात असे अमुचा नवीन अनोखा हर्ष,
त्या आनंदाला हा वास सुटे जेव्हा होई तुझा स्पर्श.

लेक्चर  मध्ये सतत असतो  तुझाच गाजावाजा ,
ढोल समजून मॅम वाजवी आमचाच बैंडबाजा 

सर्वांच्या तोंडावर असते तुझीच खास चर्चा,
मनात येते तुझ्या विरोधात काढावा एक मोर्चा,

पुजारी ही करत नसेल जेवढी देवाची स्तुती,
करतो आम्ही तुझी तेवढी, आमची हरपली स्मृती.




ओंकार दिनेश जुवेकर 
M Sc बायोटेक 
रामनारायण रुईया कॉलेज

From 'आई शप्पथ ' to 'ए धावा रे पटापट '

         जरा विचित्र वाटतय ना शीर्षक वाचून. पण ट्रेकला गेल्यावर एकाच वेळी या दोन्ही भावना कानांवर पडल्या नाही  असा ट्रेकच होत नाही.एखादा नवखा ट्रेकर असेल तर ट्रेक करताना सतत त्याच्या मनात  हेच शब्द येतात " आई शप्पथ! हा काय tough patch  आहे. मी कसा चढणार?"." आई शप्पथ ! इकडून उतरताना तर माझी वाटच लागणार ." त्याच्या चेहऱ्यावरच्या घामावरून आणि मनात असण्याऱ्या tension वरुण आपण आरामात ओळखू शकतो , हा ह्याचा पहिलाच ट्रेक असणार. या उलट एखादा ट्रेकर ज्याने किमान ७-८ ट्रेक केलेले असतात व ट्रेकींग या कलेशी जो थोडा फार सुसंगत असतो , तो तर सगळ्यांना पाळायलाच सांगत असतो.त्याचा attitude थोडा बिनधसच असतो. त्याला आपल्याबरोबर हळू चालणारी मंडळी तर boreच वाटतात .अश्या  या दोन विरोदाभास असणाऱ्या भावना पण प्रत्येक ट्रेकला सापडतातच.

       मजेशीर म्हणजे मी ह्या दोन्ही category मधेल्या व्यक्तिरेखा अनुभवल्या आहेत. एखाद्या नवख्या ट्रेकरच्या भावना, त्याला असलेलं दडपण, tension हे तर मला माझ्या पहिल्या ट्रेक मध्ये कळलचपण आता जेव्हा आम्ही लोकांना ट्रेकिंगसाठी घेऊन जातो तेव्हा मला ही दुसरी बाजू देखील हळू हळू उमजायला लागली आहे. माझा तसा ट्रेकिंग चा अनुभव काही जास्त नसून चार वर्षांचाच आहे  तरी ही, नवखा घाबरूट ट्रेकर ते 'Organiser ऑफ HYBRID TREKKER ' चा प्रवास कसा पटकन घडला हे माझा मलाच कळलं नाही.

      माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक हा राजगड-तोरणा. आता मागे वळून वाटतं आपली ट्रेकिंग ची गाडी direct तिसऱ्याच gear  मध्ये सुरु झाली. पण बरंच झालं ना एकदा कठीण विषयाचा पेपर सोडवला की बाकीचे पेपर हे बऱ्यापैकी सोपेच वाटतात. ट्रेकिंग च्या आठवणीतील तो ट्रेक अविस्मर्णीयच राहणार, आयुष्यभर. तो गारठा, ते धुकं ती हिरवळ आणि सतत ती मनातली धडधड .ते क्षण विसारणा अशक्यच. स्पेकिअल्ल्य, राजगा ते तोरणा चा प्रवास. पायाच्या नुसत्या काड्या झाल्या होत्या आणि पोटात कावळ्यांचा ओरडून ओरडून घसा बसलेला. माझ्या आठवणी प्रमाणे मी अर्धा ट्रेक तर बसूनच केलेला आणि सतत मदतीसाठी हाथ मागून मित्रांना भंडावून सोडलं होतं.  

       पण आता मागे वळून पाहिलं तर वाटतं बराच पाणी पुलाखालून गेलाय. त्या काळी घाबरत उतरलेले patches आज सराईत धावत पार करताना काहीच वाटत नाही. ह्याचं कारण कदाचित  HYBRID असावं. ४०-५० लोकांना एकत्र ट्रेकसाठी घेऊन जाणं, त्यांची ख्याली खुशाली बघणं व त्यांना सुखरूप परत आणणं. ह्याची जबाबदारी, त्याचं तेन्सिओन, हे त्या tough patches च्या तुलनेत खूपच challenging वाटतं.पण समाधानाची गोष्ट अशी की The journey is going on smoothly.

       पार "अभी दिल्ली बहुत दूर हैं |"," ये तो सिर्फ शुरुवात हैं | बघायला गेलं तर ही सुरुवातच आहे. या वर्षी १५ ऑगस्ट ला HYBRID  ला एक वर्ष पूर्ण झाली आणि हा खास दिवस आम्ही परत राजगडावर साजरी करायचे ठरवले. आत्ता कुठे आम्हाला पंख फुटले आहेत, अजून आकाशात उंच झेप घ्यायची बाकी आहे.Indeed Sky is the limit for us.




ओंकार दिनेश जुवेकर
HYBRID TREKKERS 

Saturday, 5 November 2011

आई ...........



गर्भाशयाच्या अनोळखी स्थळी,
विसावलो होतो मी सुखाने,
अज्ञात होते स्थळ मजला ,
तरी नांदत होतो मी दिमाखाने.

एका अंशातून मजला,
झाला उद्धार तुझ्या अंगणी ,
प्रेमापोटी तृप्त झालो,
लाभले मला अन्वस्त्रपाणी .

नऊ महिन्यांचा तो खडतर प्रवास,
भोगलास तू माझ्यासाठी ,
यातना दुःखे अनेक अडचणी,
सोसलेस तू प्रेमासाठी .

अज्ञात असणार जग पुढचे ,
मिळेल मला नवीन द्रुष्टी ,
कवेत तुझ्या विसावलो असेन ,
ज्ञानी होईल संपूर्ण सृष्टी .

गेल्या जन्माचे पुण्य असता ,
जन्म मिळाला तुझ्याच पोटी,
आई ह्या शब्दातच दडलंय,
विश्वातील सुख अनंतकोटी.   





ओंकार  दिनेश जुवेकर



Friday, 4 November 2011

कवी मना.......................

का रे कवी मना करतोस आमच्यावर एवढा अन्याय ,
आम्हा सोडून नेहमी पावसाळ्यावरच रचतो नवा अध्याय .

उन्हाळ्याचे महत्त्व तुला कळले नाही का रे कधी,
सुट्ट्यांचे प्लान्स येथे ठरतात परीक्षेच्या ही आधी.

आंब्याची चव चाखायला कोणी गेले असते का गावी,
आपल्या कवितांमध्ये जरा आमची देखील नोंद घ्यावी .

का रे सतत धबधाब्यांचे ,झऱ्यांचे स्वर पडतात तुझ्या कानी ,
वसंतातल्या पक्ष्यांची किलबिल कधी आली नाही ध्यानी .

मानले पावसाळ्यात सर्वत्र पसरतात हिरवे गालीचे आणि सप्तरंगी धनु,
रंगीबेरंगी वसंत फुलांना काव्यात आणलेस तरच तुला कवी मानु.

अनुभवला आहेस का कधी तू थंडीतला गुलाबी गारवा,
प्रेयसीला खुश करायला येथे बेसुर देखील गातो मारवा.

असतात फळफुले सणउत्सव आमच्यांमध्ये देखील,
आशा करतो रिमझिम सोडून कधी आम्हा सुद्धा भाव देशील.






 ओंकार दिनेश जुवेकर.




   

कॉलेज माझी अनमोल जान

कॉलेज माझी अनमोल जान,
आम्हा सर्वांचा जीव एके  प्राण,
तुला विसरु तरी कसे मला सांग,
कॉलेज माझी अनमोल जान.

कट्ट्यावरची गरम कट्टिंग,
मित्रांमधली चुरशी बेट्टिंग,
कशी विसरु ती कैंटीन मधली सुरेल गान, 
कॉलेज माझी अनमोल जान.

Bird watching करण्याचा निखळ आनंद,
मुलांचा होता एकच छंद,
छंद जोपासण्यात हरपले भान,
कॉलेज माझी अनमोल जान.

Lectures मध्ये काढल्या झोपा,
Pracs मध्ये values ढापा,
पास होण्याकरता तडफड फार,
कॉलेज माझी अनमोल जान.

साजरी केले मित्रांचे birthdays ,
Rose डे, tie  डे, वा असो फ्रेंडशिप डे,
अविस्मर्णीय आठवणी होत्या खुपच छान,
कॉलेज माझी अनमोल जान.

अल्पकाळातच जुळली  चिरायु नाती,
आयुष्यभराच्या रेशीमगाठी,
भविष्य असणार अज्ञात रान,
कॉलेज माझी अनमोल जान.


ओंकार दिनेश जुवेकर
 

बायोटेक चा मुलगा

बायोटेकचा student जेव्हा admission घेतो ,
तेव्हा तो activated T cell सारखा वागतो ,
स्वताःचे cytokines release करून,
तो सर्व मुलींवर shine मारू पाहतो.

जेव्हा बायोटेकच्या मुलाला, एखादी मुलगी आवडायला लागते ,
तेव्हा तो E.coli सारखा वागायला लागतो ,
Glucose ला दिला जातो chemotaxis चा पहिला मान ,
नंतर गरज वाटली तर lactose (इतर मुली ) ला ही भाव मिळतो.

जेव्हा बायोटेकचा मुलगा तिच्या प्रेमात पडतो,
तेव्हा तो एखाद्या enzyme सारखा वागायला लागतो,
सगळ्या मुली त्याला substrate सारख्या वाटतात ,
पण preference मात्र highest affinity लाच मिळतो.

जेव्हा आपल्या बायोटेक मुलाचं प्रेम बहरू पाहतं,
तेव्हा तो cancerous cells सारखा वागतो,
साऱ्या दुनियेशी त्याचे connection तुटले असते,
पण स्वतःच proliferation मात्र अमाप करून घेतो.

ह्याच बायोटेक मुलाचा जेव्हा ब्रेकअप होतो,
तेव्हा तो denatured protein झाल्या सारखा वागतो ,
Inactivated state मध्ये त्याला मिळतो काडीचा भाव ,
आणि favourable conditions च्या प्रतिक्षेत तो पुढचं आयुष्य जगतो.



ओंकार दिनेश जुवेकर
बायोटेक, रामनारायण रुइया कॉलेज