Friday, 4 November 2011

कवी मना.......................

का रे कवी मना करतोस आमच्यावर एवढा अन्याय ,
आम्हा सोडून नेहमी पावसाळ्यावरच रचतो नवा अध्याय .

उन्हाळ्याचे महत्त्व तुला कळले नाही का रे कधी,
सुट्ट्यांचे प्लान्स येथे ठरतात परीक्षेच्या ही आधी.

आंब्याची चव चाखायला कोणी गेले असते का गावी,
आपल्या कवितांमध्ये जरा आमची देखील नोंद घ्यावी .

का रे सतत धबधाब्यांचे ,झऱ्यांचे स्वर पडतात तुझ्या कानी ,
वसंतातल्या पक्ष्यांची किलबिल कधी आली नाही ध्यानी .

मानले पावसाळ्यात सर्वत्र पसरतात हिरवे गालीचे आणि सप्तरंगी धनु,
रंगीबेरंगी वसंत फुलांना काव्यात आणलेस तरच तुला कवी मानु.

अनुभवला आहेस का कधी तू थंडीतला गुलाबी गारवा,
प्रेयसीला खुश करायला येथे बेसुर देखील गातो मारवा.

असतात फळफुले सणउत्सव आमच्यांमध्ये देखील,
आशा करतो रिमझिम सोडून कधी आम्हा सुद्धा भाव देशील.






 ओंकार दिनेश जुवेकर.




   

3 comments:

  1. khhooop chaaan... garv aahe, mala tujhi maitrin aslyaacha

    ReplyDelete
  2. baap re sonal khupach motha bolun gelis,me dhanya zalo....thank u very much

    ReplyDelete
  3. khupach chhan kavita...lay bhaari!!!

    ReplyDelete