Tuesday, 8 November 2011

बायोटेकचं जर्नल

जर्नल मध्ये जर्नल बायोटेकचं जर्नल ,
कागदी नुसतं पुस्तक की आहे आर्मीतला कर्नल.

नवीन वर्षात असे अमुचा नवीन अनोखा हर्ष,
त्या आनंदाला हा वास सुटे जेव्हा होई तुझा स्पर्श.

लेक्चर  मध्ये सतत असतो  तुझाच गाजावाजा ,
ढोल समजून मॅम वाजवी आमचाच बैंडबाजा 

सर्वांच्या तोंडावर असते तुझीच खास चर्चा,
मनात येते तुझ्या विरोधात काढावा एक मोर्चा,

पुजारी ही करत नसेल जेवढी देवाची स्तुती,
करतो आम्ही तुझी तेवढी, आमची हरपली स्मृती.




ओंकार दिनेश जुवेकर 
M Sc बायोटेक 
रामनारायण रुईया कॉलेज

2 comments: